आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,९४० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,५९० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६५,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,९४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,९४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,१२० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,६३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,९४० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,९४० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६५० रुपये आहे.

Micron thread and saree cloth lanterns are most in demand thane news
परतीच्या पावसातही पर्यायी पर्यावरणपूरक कंदील; मायक्रोन धागा आणि साडीच्या कपड्यांच्या कंदीलांना सर्वाधिक मागणी
26 October Daily Horoscope IN Marathi
Daily Horoscope, 26 October : आज मेष ते…
why water tanks are black in colour
घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीचा रंग काळाच का असतो? अन् त्यावर रेषा का असतात?
Gold & Silver Price Hike: Record High Rates Before Diwali
Gold Silver Price : दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ! चांदीचा दर ९० हजाराच्या पुढे; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचा दर
Beauty Influencer Hacks
चेहऱ्यावरील मुरूम दूर करण्यासाठी कच्चा लसूण वापरणे फायदेशीर आहे का? वाचा तज्ज्ञांचे मत
loksatta Lokshivar fake onion seeds in the market has increased for sale
लोकशिवार: कांद्याच्या बनावट बियाण्यांचा धोका
car during Diwali Important tips
दिवाळीच्या दिवसात फटाक्यांमुळे होऊ शकते तुमच्या गाडीचे नुकसान; सुरक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स
wastage of food grains
विश्लेषण: शेतमालाची नासाडी केव्हा थांबणार?

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.