Gold-Silver Rate Today: आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,२५० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,२५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,४६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,१५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,३५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,४६० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६४४ रुपये आहे.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार
stock market ups downs loksatta
Money Mantra : कधी अप कधी डाऊन ! गुंतवणूकदारांनी करायचं तरी काय ?

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Story img Loader