आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,८०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,९५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६६,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,८०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,१४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१९० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६६६ रुपये आहे.

gold silver rate today, Gold Silver Price 11 january 2025
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरातील वाढ सुरूच, आज २२, २४ कॅरेट सोन्याचा दर काय? जाणून घ्या
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Gold imports down by 5 billion print eco news
सोन्याची आयात ५ अब्ज डॉलरने कमी; सरकारची नोव्हेंबर महिन्याची सुधारित आकडेवारी समोर
Hallmark certification of silver purity made mandatory soon
चांदीच्या दागिन्यांची अस्सलता तपासणे होईल सोपे; सोन्याप्रमाणेच शुद्धतेच्या हॉलमार्क प्रमाणनाची सक्ती लवकरच 
January 6 price of gold and silver has decreased
नववर्षात प्रथमच सोने-चांदीच्या दरात घट… हे आहेत आजचे दर…
Gold Silver Price Today 6 January 2025 in Marathi
Gold Silver Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या, तुमच्या शहरातील भाव
gold silver rate 5 january 2025 in marathi
Gold Silver Price Today : नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्याच्या शेवटी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आज २२ कॅरेट सोन्याचा दर घ्या जाणून
gold rates first day of the new year 2025
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या……

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Story img Loader