गुगल अ‍ॅप्स चालवण्याचे प्रशिक्षण देणारा भारतीय वंशाच्या उद्योजकाने सुरू केलेला नवोद्योग गुगल कंपनीने अधिग्रहित केला आहे. गुगलच्या ग्राहकांना गुगल अ‍ॅप चालवण्याचे प्रशिक्षण देण्याबाबतचा हा उद्योग वरूण मल्होत्रा यांनी स्थापित केला आहे.
मल्होत्रा हे सध्या टोरांटो येथील सिनर्जाइज या नवोद्योग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. हा नवोद्योग २०१३ मध्ये त्यांनी सुरू केला होता. नेमका किती मोबदल्यात त्यांची कंपनी अधिग्रहित केली गेली याचा आíथक तपशील गुगलने जाहीर केलेला नाही. गुगल अ‍ॅप्स ऑपरेशन्सचे वरिष्ठ संचालक पीटर सोसीमारा यांनी ब्लॉग पोस्टमध्ये हा नवोद्योग विकत घेत असल्याचे म्हटले आहे.
गुगल व तिच्या ग्राहकांना सिनर्जाइज या उद्योगाबाबत कुतूहल आहे. सोकीमारा यांच्या मते गुगल अ‍ॅप उत्पादनात जीमेल, कॅलेंडर, ड्राइव्ह,डॉक्स या अ‍ॅप्सचा समावेश असून क्लाउड आधारित उत्पादनशीलता व संदेशवहन वाढ यासारख्या मार्गानी या नवोद्योगाने २० लाख ग्राहक मिळवले आहेत.
याबाबत अधिकृतपणे करार झाला असून या माध्यमातून गुगल अ‍ॅप्सचे प्रशिक्षण ग्राहकांना दिले जाईल, शिवाय आमच्या ग्राहकांचे जे ग्राहक असतील त्यांनाही ते दिले जाईल. गुगल अ‍ॅप्सचा आभासी प्रशिक्षक म्हणून सिनर्जाइज कंपनीच्या सेवेचा वापर केला जाणार आहे. आवाज व टेक्स्ट यांच्या आंतर प्रतिसादात्मकतेचा उपयोग यात केला जाणार असून त्यांच्या मदतीने अ‍ॅपची निवड करता येईल. कुठल्याही अ‍ॅपची काही गुणवैशिष्ट्ये जाहीर असतानाच ग्राहकांना त्या टप्प्यातच त्याचा वापर शिकवला जाईल.
सिनर्जाइज आता गुगलचा भाग म्हणून काम करील व गुगल अ‍ॅप्सचा एकात्मिक भाग म्हणून ते वापरण्याचे प्रशिक्षणही दिले जाईल. ग्राहकांना योग्यवेळी योग्य मदत मिळाल्याने आता सिनर्जाइजमुळे वेळोवेळी अ‍ॅपमध्ये होणाऱ्या बदलांना सामारे जाता येईल. सिनर्जाइजने म्हटले आहे की, आता प्रत्यक्ष गुगल अ‍ॅप तयार करणाऱ्यांच्या समवेत काम करायला मिळणार असल्याने त्याचा फायदाच होईल. मल्होत्रा यांना प्रशिक्षण व धोरण या क्षेत्रातील किमान दहा वर्षांचा उद्योगानुभव आहे, असे कंपनीच्या संकेतस्थळावरील माहितीत म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा