रिझव्‍‌र्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदासाठी प्रतीक्षित असलेल्या जी. गोपालकृष्णन यांनी मध्यवर्ती बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. जानेवारी २०१४ मध्ये निवृत्त झालेल्या आनंद सिन्हा यांच्या जागेवर रिझव्‍‌र्ह बँकेने काही दिवसांपूर्वीच मध्यवर्ती बँकेच्या सेवेतच असलेल्या आर. गांधी यांची डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती जाहीर केली होती.
गोपालकृष्णन यांची स्वेच्छानिवृत्ती २० एप्रिलपासून अमलात आली असून त्यांनी सोमवारपासूनच ‘सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड फायनान्शिअल रीसर्च अ‍ॅण्ड लर्निग (सीएफएएफआरएल)’च्या संचालकपदाची सूत्रे स्वीकारली आहे. ही संस्था रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहकार्याने चालविली जाणारी वित्तीय संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील अ-शासकीय संस्था आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेत असलेल्या चार डेप्युटी गव्हर्नरपदांपैकी दोन पदे ही रिझव्‍‌र्ह बँकअंतर्गत रचनेतील असतात, तर एक अन्य वाणिज्यिक बँक व एक वित्तीय क्षेत्रातील असते. पैकी बँक क्षेत्रातील के. सी. चक्रवर्ती हेही आठवडाअखेर रिझव्‍‌र्ह बँकेतून बाहेर पडत आहेत. आनंद सिन्हा हे जानेवारीमध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेसाठी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी घेतलेल्या मुलाखतीत गोपालकृष्णन यांच्यासह तब्बल नऊ कार्यकारी संचालक पदावरील व्यक्तींचा समावेश होता. अखेर या पदावर आर. गांधी यांची नियुक्ती केल्यानंतर गोपालकृष्णन हे नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली. १९८० मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेत रुजू झाल्यानंतर ते कार्यकारी संचालक या नात्याने विदेशी चलन व्यवस्थापन, बिगर बँकिंग वित्त कंपन्यांचे व्यवहार पाहत होते.
आनंद सिन्हा यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी गोपालकृष्णन यांच्यासह रिझव्‍‌र्ह बँकेतील तब्बल नऊ कार्यकारी संचालक पदावरील व्यक्तींच्या मुलाखती गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी घेतल्या. अखेर या पदावर आर. गांधी यांची नियुक्ती झाल्यानंतर गोपालकृष्णन हे नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली.

Story img Loader