छोटय़ा बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याची मात्रा चालू महिनाअखेपर्यंत लागू होण्याची शक्यता आहे. हे दर बाजारनिगडित गुंतवणूक योजनांच्या दरांशी साधम्र्य राखणारे असतील, असे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
ज्येष्ठ नागरिक तसेच सुकन्या समृद्धी योजनांना यातून वगळले जाण्याची शक्यता आहे. छोटय़ा बचत योजनांवर सध्या वार्षिक ८.७ ते ९.३ टक्के व्याज लागू आहे.
छोटय़ा बचत ठेवी व त्यावरील व्याजदराबाबत आढावा घेण्याचे संकेत सरकारने सप्टेंबरमध्ये दिले होते. यानुसार या ठेवींवरील वार्षिक व्याजदर कमी केले जातील, अशी शक्यता निर्माण झाली होती.
टपाल विभागाच्या मासिक उत्पन्न योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, टपाल विभागाच्या स्थिर मुदत ठेवी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, टपाल विभागाचे बचत खाते तसेच नव्याने सुरू झालेले सुकन्या समृद्धी खाते आदींचा छोटय़ा बचत योजनांमध्ये समावेश होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा