देशातील प्रमुख कंपन्यांच्या त्या त्या वर्षांतील आर्थिक कामगिरीचा आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे निदर्शक असलेला अग्रिम करभरणा चालू आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीतील १८ मार्च या अंतिम मुदतीअखेर फारसा उत्साहवर्धक नसल्याचे आढळून आले आहे.
आयटी कंपन्यांनी गेल्या वर्षांच्या तुलनेत वाढीव करभरणा केला असला, तरी मंदीच्या पाश्र्वभूमीवर अन्य उद्योगक्षेत्रातून एकतर अग्रिम करभरणा नाहीच, तर स्टेट बँक आणि अन्य वाणिज्य बँकांनी गेल्या वर्षांइतकाच यंदा करभरणा केल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसते. मुंबईच्या प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनीही जमा झालेल्या कराच्या आकडय़ांबाबत निराशा व्यक्त केली आहे.
देशाच्या एकूण कर महसुलात ३३ टक्के वाटा असलेल्या आर्थिक राजधानी मुंबईतून बुधवार, १८ मार्च या अंतिम मुदतीच्या शेवटापर्यंत विविध कंपन्यांकडून झालेला अग्रिम करभरणा गेल्या वर्षांच्या तुलनेत जेमतेम वाढला आहे. मुंबईतून प्राप्तिकर विभागाने २०१३-१४ आर्थिक वर्षांसाठी २.०४ लाख कोटी रुपये कररूपाने गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जे साधले जाणे कठीण दिसत आहे.
अग्रिम कर भरणाऱ्या प्रमुख कंपन्या
(सर्व आकडे कोटी रुपयांत, कंसातील आकडे गतवर्षांतील मार्च २०१३ तिमाहीतील)