रिझव्‍‌र्ह बँकेचे आजवरचे सर्वात तरुण आणि बिगर प्रशासकीय पाश्र्वभूमी असलेले गव्हर्नर म्हणून अर्थतज्ज्ञ डॉ. रघुराम राजन हे बुधवारी सूत्रे हाती घेतील, तथापि पूर्वसंध्येला म्हणजे मंगळवारी रुपयाने डॉलरच्या तुलनेत ६८च्या खोलात जाऊन त्यांना आगामी आव्हानांची चुणूक दाखविली. दिवसअखेर चलन तब्बल १६३ पैशांनी घसरत प्रति डॉलर ६७.६३ वर विसावले.
गेल्या महिन्याभरापासून कर्तव्यावरील अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजन हे बुधवारी विद्यमान गव्हर्नर डी. सुब्बाराव यांच्याकडून सूत्रे हाती घेतील. पण त्याचवेळी सिरिया युद्धाच्या चिंतेने भांडवली बाजाराबरोबरच रुपयावरही दबाव निर्माण केला. कालच्या सत्रात ६६ वर असणारा रुपया सकाळच्या सत्रात ६६.२९ पासून सुरुवात करत ६८.२५ या दिवसाच्या नीचांकाला गेलेला दिसून आला. काहीसा सावरून तो ६७.७३ वर स्थिरावला.

Story img Loader