आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे पडते भाव पाहून भारत सरकारने सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोन्याचे दर प्रती दहा ग्रॅमला ४४० डॉलर पर्यंत खाली येतील, अशी शक्यता आहे. चांदीच्या बाबतीत आयात शुल्क कमी होणार नाही. परिणामी चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे प्रती औसाला ७६१ डॉलर राहतील.
आयात शुल्कावरून सोन्याचे देशांतर्गत बाजारभाव ठरतात. आयात शुल्क व आतरराष्ट्रीय बाजारानुसार सोन्याची किंमत निश्चित केली जाते. केंद्रीय उप्तादन आणि आयातशुल्क मंडळाने या संबंधात अधिसुचना काढून ही माहिती दिली आहे. मात्र, वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला, खाद्य तेले यांवरील आयात शुल्क कायम ठेवले आहे.    
राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचे भाव २७,००० रूपये प्रती दहा ग्रॅम व चांदीचे भाव ४४,२०० प्रती किलो आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त सोन्याचा वापर होतो. या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान एकूण २१५ टन सोन्याची आयात भारताने केली आहे. जागतिक सोने परिषदेच्या माहिती नुसार येत्या काही महिन्यांत सोन्याची मागणी वाढणार आहे.

Story img Loader