निवडक स्टील उत्पादनांवरील आयात शुल्क केंद्र सरकारने बुधवारी २.५ टक्क्यांपर्यंत वाढविले. प्रामुख्याने चीन तसेच रशिया येथून होणाऱ्या वाढत्या स्टील आयातीमुळे स्थानिक उत्पादकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने याबाबतचा निर्णय केंद्रीय उत्पादन व सीमाशुल्क मंडळाने जारी केला आहे.
यानुसार ‘फ्लॅट’ स्टील उत्पादनावरील आयात शुल्क ७.५ टक्क्यांवरून १० टक्के तर ‘लॉन्ग’ स्टील उत्पादनावरील आयात शुल्क ५ टक्क्यांवरून ७.५ टक्क्यांवर नेले आहे. दरम्यान, वाढीव उत्पादन शुल्काचा निर्णय केंद्र सरकाने निवडक देशांसमोर ठेवून घेतला असला तरी भारतातील स्टील उत्पादक व चीनमधील उत्पादकांच्या दरांमध्ये केवळ २.५ टक्क्यांपर्यंतचाच फरक पडेल, असे मत ‘इंडिया रेटिंग्ज’ने मांडले आहे.

Story img Loader