चालू खात्यातील तूट विस्तारण्यास कारणीभूत ठरलेल्या मौल्यवान धातूच्या वाढत्या हव्यासाला र्निबध म्हणून सोने-चांदीच्या दरांवर पुन्हा एकदा वाढीव शुल्काचा बडगा उगारण्यात आला आहे. यापूर्वी वेळोवेळी आयात शुल्क वाढूनही जुलैमध्ये सोन्या-चांदीची वाढती आयात कायम राहिल्याने यंदा हे शुल्क थेट १० टक्क्यांपर्यंत नेण्यात आले आहे. परिणामी, धातूंच्या दरांनी झेप घेणे सुरू केले असून ही चमक ऐन
गेल्या आर्थिक वर्षांत ऐतिहासिक उच्चांकावर गेलेल्या चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी सोने-चांदीसारखी अनावश्यक आयात कमी करण्याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सोमवारीच सूतोवाच केले होते. यानुसार ८ टक्क्यांवरून आयात शुल्क १० टक्के करण्याचा निर्णय आज घोषित करण्यात आला. गेल्या आठ महिन्यातील ही तिसरी शुल्क वाढ आहे. याचबरोबर सोन्याच्या वीटेवरील आयात शुल्कही ७ टक्क्यांवरून वाढवून ९ टक्के करण्यात आले आहे. सोन्याबरोबरच चांदीवरील आयात शुल्कही ६ टक्क्यांवरून एकदम १० टक्के करण्यात आले आहे. जुलैमध्ये मौल्यवान धातूची २.९ अब्ज डॉलरची आयात झाली आहे. तत्पूर्वीच्या महिन्यात ती कमी होऊन २.४५ अब्ज डॉलर झाली होती. त्यामुळेच त्यावेळी वाढीव शुल्काची शक्यता अर्थमंत्र्यांनी फेटाळून लावली होती. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील मौल्यवान धातूंची एकूण आयात ३३५.५ अब्ज टन झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा