येत्या एप्रिल महिन्यापासून वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) भरणा करणे अधिक सोपे आणि सुटसुटीत होणार आहे. त्यासाठीचे सोपे रिटर्न फॉर्म आणण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी स्पष्ट केले. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना शनिवारी त्यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सीतारामन म्हणाल्या, जीएसटीमुळे ग्राहकांना १ लाख कोटींचा नफा झाला आहे. त्याचबरोबर यामुळे देशातील ‘इन्स्पेक्टर राज’ही संपुष्टात आला आहे. तसेच यामुळे वाहन क्षेत्रासाठीही मोठी मदत झाली आहे.

आणखी वाचा – Budget 2020: उद्योजकता हे भारताचे बलस्थान आहे – निर्मला सीतारामन

जीएसटी लागू झाल्यानंतर सरासरी घरगुती खर्चामध्ये ४ टक्के प्रति महिना इतकी घट झाली आहे. दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या इच्छा-आकांक्षांची पूर्ती करणे हे आमचे ध्येय असल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे.