वैश्विक बँक परवान्यांसाठीची मार्गदर्शक तत्त्वे चालू आर्थिक वर्षांच्या अखेपर्यंत म्हणजे मार्च २०१५ पर्यंत जारी केली जातील, अशी माहिती रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी दिली. र्सवकष बँकिंग सेवेसाठी हे परवाने जारी करण्याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांवर रिझव्‍‌र्ह बँक कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘फिक्की’ या उद्योग संघटनेच्या वतीने आयोजित दोन दिवसांच्या बँकविषयक परिषदेत ते बोलत होते. ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ या बँकांच्या शिखऱ् संघटनेनेही या परिषदेसाठी सहकार्य केले आहे. परिषदेत पहिल्या दिवशी रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी संबोधित केले होते. दुसऱ्या दिवशी गांधी यांनी परिषदेत उपस्थिती दर्शविली.
रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीच देयक बँक आणि छोटय़ा बँक परवान्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वांचा मसूदा जारी केला आहे. मसुद्यावरील सूचना-शिफारशी सध्या रिझव्‍‌र्ह बँकेकडे येत असून या मार्गदर्शक तत्त्वांना अंतिम रूप लवकरच दिले जाईल, असेही गांधी म्हणाले.
बँकांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पद भिन्न  ठेवण्याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने नियुक्त केलेल्या पी. जे. नायक समितीच्या शिफारशींवर रिझव्‍‌र्ह बँकेचा अभिप्राय सरकारला सूचित करण्यात आला असून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संचालक मंडळावरील सदस्यांच्या निवड-नियुक्तीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याबाबतही सरकारला कळविण्यात आल्याचे गांधी यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा