विविध सणोत्सव आणि रंगतदार कार्यक्रमांच्या मेजवानीसह गुजरात पर्यटन मंडळाने पद्धतशीर आखलेल्या मोहिमांच्या बळावर चालू २०१३ वर्षांत एकूण पावणेतीन कोटी पर्यटकांना राज्यात आकर्षित करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठरविण्यात आले आहे. गेल्या वर्षांच्या २.२५ कोटींच्या तुलनेत यंदा पर्यटकसंख्येत २२ टक्क्यांनी वाढ अपेक्षिण्यात आली आहे. ‘टुरिझम कॉर्पोरेशन ऑफ गुजरात लि.’चे अध्यक्ष कमलेश पटेल हे नुकतेच मुंबईत आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाच्या निमित्ताने आले असताना त्यांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आखलेल्या नियोजनाची माहिती दिली. सध्या गुजरात राज्याच्या २२ जिल्ह्यात रु. ७३० कोटी खर्चाची पर्यटनाच्या पायाभूत सुविधांमध्ये विकासाची कामे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पतंग महोत्सवाचे आयोजन त्याचप्रमाणे स्थानिक सहल-आयोजकांशी गाठी-भेटीचा कार्यक्रम म्हणून ते मुंबईसह दिल्लीचाही दौरा करणार आहेत. १४ जानेवारीला अहमदाबादस्थित साबरमतीच्या नदीतटावर आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाची तयारी म्हणून पटेल यांचा दौरा सुरू आहे.
‘गुजरात टुरिझम’चे यंदा पावणेतीन कोटी पर्यटकसंख्येचे लक्ष्य
विविध सणोत्सव आणि रंगतदार कार्यक्रमांच्या मेजवानीसह गुजरात पर्यटन मंडळाने पद्धतशीर आखलेल्या मोहिमांच्या बळावर चालू २०१३ वर्षांत एकूण पावणेतीन कोटी पर्यटकांना राज्यात आकर्षित करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठरविण्यात आले आहे.
First published on: 08-01-2013 at 12:05 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat tourism targets 2 75 crore tourists in