अग्रणी फिलिप्सला टक्कर देऊन, २५ टक्के बाजारहिश्श्याचे लक्ष्य

पंखे आणि प्रकाश उपकरणांच्या क्षेत्रातील प्रमुख उत्पादक हॅवेल्स इंडियाने वैयक्तिक शरीर निगा उपकरणांच्या निर्मितीत प्रस्थापित फिलिप्सला आ्व्हान देऊन शिरकाव बुधवारी जाहीर केला. येत्या दोन वर्षांत २५ टक्के बाजारहिस्सा काबीज करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

वैयक्तिक निगा उपकरणांची मालिका हॅवेल्स इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष सौरभ गोएल यांनी बुधवारी येथे प्रस्तुत केली. या प्रसगी कंपनीचे उपाध्यक्ष टॉम जोसेफ आणि अनिल शर्मा उपस्थित होते. पुरुष व महिलांसाठी इलेक्ट्रॉनिक शेव्हर्स, ट्रिमर्स आणि एपिलेटर्ससह वेगवेगळे १७ गॅझेट्सचे या प्रसंगी अनावरण करण्यात आले. फिलिप्सचा या उत्पादन वर्गामध्ये बाजारात वरचष्मा आहे. या उपकरणांचे उत्पादन चीन, हाँगकाँग आणि तैवानमधील उत्पादकांकडून घेतले जाणार असून हॅवेल्स त्यांची भारतात विक्री करणार आहे.