दोन्ही बँकांचे किमान ऋणदर ९.३० टक्क्य़ांवर!
एचडीएफसी बँक या देशातील आघाडीच्या खासगी बँकेने तिचा ऋण दर (बेस रेट) ०.०५ टक्क्याने कमी केल्याने बँकेचे सर्व कर्ज व्याजदर कमी होणार आहेत. बँकेचा नवा ऋण दर आता ९.३० टक्के राहणार असून त्याची अंमलबजावणी सोमवारपासूनच झाली आहे. एचडीएफसी बँकेने यातून देशातील बँकिंग अग्रणी भारतीय स्टेट बँकेशी बरोबरी साधली आहे.
यापूर्वी स्टेट बँकेने तिचे कर्ज व्याजदर कमी केले आहेत, तर एचडीएफसी बँकेने याआधी सप्टेंबर २०१५ मध्ये दर कपात केली होती. ऋण दरापेक्षा कमी स्तरावर बँकांना कर्ज दर आकारता येत नाही. बँकेने तिच्या ठेवींचे दर तूर्त स्थिर राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.