मध्यवर्ती बँकेने दर कपात करूनही बँका मात्र त्याची अमलबजावणी न करण्याची रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. राजन यांची तक्रार खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने मात्र काहीशी दूर केली आहे.
बँकेने तिचे विविध कर्ज कमी करण्याचा निर्णय सोमवारी अचानक घेतला. बँकेने तिचा आधार दरच थेट ०.३५ टक्क्य़ांनी केला आहे. यामुळे बँकेची कर्जे स्वस्त होणार असून बँकेचा ९.३५ टक्के हा आधार दर बँक क्षेत्रातील सर्वात कमी आहे.
एचडीएफसी बँकेने आधार दर ९.७० टक्क्य़ांपासून खाली आणत अन्य बँकांशी अनोखी स्पर्धा केली आहे. स्टेट बँकेने यापूर्वी रिझव्र्ह गव्हर्नरांच्या समक्षच पुन्हा एकदा व्याजदर स्वस्ताईत उडी घेण्याचा मनोदय व्यक्त केला होता.
वार्षिक ९.७० टक्के हा आधार दर तूर्त या क्षेत्रातील अन्य स्पर्धक स्टेट बँक व आयसीआयसीआय बँक राखून आहेत. आधार दरापेक्षा कमी दरात वाणिज्यिक बँकांना कर्ज पुरवठा करता येत नाही.
रिझव्र्ह बँकेने २०१५ मध्ये आतापर्यंत तीन वेळा प्रत्येकी पाव टक्क्य़ाची दर कपात केली आहे. मात्र अन्य बँका दर कपात करत नाही, अशी गव्हर्नरांची बँकांबाबत तक्रार राहिली आहे. मध्यवर्ती बँकेचे आगामी पतधोरण सप्टेंबर अखेरिस सादर होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा