निर्गुतवणूक प्रक्रियेसाठी सार्वजनिक क्षेत्रातील हिंदुस्थान कॉपरचा समभाग सरकारने गुंतवणूकदारांना तब्बल ७१ टक्क्य़ांच्या सवलतीने उपलब्ध करून दिला आहे. कंपनीचा समभाग मुंबईच्या शेअर बाजारात दिवसअखेर २६६.३० रुपयांवर बंद झाला असताना कंपनीच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या भागविक्रीसाठी त्यांची किंमत १५५ रुपये निश्चित केली. या माध्यमातून या कंपनीतून सरकारचा हिस्सा १० टक्क्य़ांनी कमी होणार असून १,३७६ कोटी रुपये उभारले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान आर्थिक सुधारणांच्या आशेवर भांडवली बाजारातील तेजी सलग दुसऱ्या दिवशी कायम राहिली आहे. बँक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभाग खरेदीच्या जोरावर ‘सेन्सेक्स’ने ५६.९६ अंशांची भर घातली. सेन्सेक्स दिवसअखेर १८,५१७.३४ वर गेला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in