सरत्या आर्थिक वर्षांत गृहकर्जाचे व्याजदर वार्षिक १० टक्क्यांपुढे चढले तरीही घरासाठी कर्जाच्या मागणीचे पारडे जडच राहिल्याचे स्पष्ट होत आहे. २०१३-१४ मध्ये भारतीयांकडून १.६० लाख कोटी रुपयांचे गृहकर्ज उचलले गेले असून वार्षिक तुलनेत ही वाढ १९ टक्के आहे. गृहकर्ज देणाऱ्या बँक, वित्तीय संस्थांचा कर्ज वितरणाचा आकडाही एकूण ९.६० लाख कोटी रुपयांवर गेला आहे. गृहकर्जाचे दर दुहेरी आकडय़ात असताना प्रति कर्जदाराचे सरासरी कर्ज उचलीचे प्रमाण १८ लाखावर गेले आहे.
देशातील गृहकर्ज बाजारपेठेत बँकांचा हिस्सा ६७ टक्के असून त्यात खासगी वित्तसंस्थांची आघाडी आहे. गृहकर्जविषयक बँका, वित्तीय संस्थांचे नियंत्रण असलेल्या ‘नॅशनल हाऊसिंग बँक’चे अध्यक्ष आर. व्ही. वर्मा यांनी सांगितले की, मार्च २०१३ अखेर गृहकर्जासाठी दिलेली एकूण थकीत रक्कम ८ लाख कोटी रुपये होती. गृहकर्जातून बँकांची अनुत्पादक मालमत्ता डिसेंबर २०१३ अखेर १.८१ टक्के राहिली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत प्रत्येक कर्जदाराला दिले गेलेल्या गृहकर्जाची रक्कम सरासरी १८ लाख रुपये आहे, असेही ते म्हणाले. घर खरेदीदारांना सोयीचे जावे म्हणून गृहप्रकल्पांना मानांकन देण्याच्या विचारात नियामक असल्याचेही वर्मा यांनी नमूद केले.

Sensex extends record run after EC nod for bank licences
Sensex, Sensex extends, bank licences, loksatta news, loksatta, marathi news, marathi
सेन्सेक्स २२,५००च्या पुढे; निफ्टीची ६,७५० आगेकूच
व्यापार प्रतिनिधी, मुंबई<br />दिवसाला विक्रम मागे टाकण्याची भांडवली बाजाराची परंपरा कायम असून बुधवारी सेन्सेक्स २२,५००च्याही पुढे गेला. निफ्टीची आगेकूच ६,७५०पर्यंत राहिली. सलग आठव्या व्यवहारात प्रमुख निर्देशांकांची तेजीसह नवी विक्रमी घोडदौड राखली गेली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स व्यवहारात २२,५९२.१०पर्यंत पोहोचल्यानंतर दिवसअखेर १०५.०५ अंश वाढीसह २२,५५१.४९ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सत्रात ६,७६३.५०पर्यंत गेल्यानंतर व्यवहारअखेर मंगळवारच्या तुलनेत ३१.५० अंश वधारणेसह ६,७५२.५५ वर स्थिरावला.
भांडवली बाजारातील विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा ओघ सलग आठव्या दिवशी कायम राहिला आहे. असे करताना त्यांनी निर्देशांकाला नव्या टप्प्यावर नेऊन ठेवले आहे.
सेन्सेक्समधील रिलायन्स, टाटा मोटर्ससारख्या समभागांना १.६ टक्क्यांपर्यंतचा वरचा भाव मिळत होता. औषधनिर्माण क्षेत्रातील सिप्ला, डॉ. रेड्डीज्सारख्या कंपन्यांनीही तेजीला हातभार लावला. मुंबई निर्देशांकातील १९ कंपनी समभाग वधारले. ३.३ टक्क्यांसह भारती एअरटेल सेन्सेक्समध्ये सर्वात वर राहिला.

बँकिंग क्षेत्राने भाव खाल्ला
रिझव्‍‌र्ह बँकेचे स्थिर व्याजदर तसेच नव्या बँक परवान्यांसाठी निवडणूक आयोगाचा अडसर बाजुला झाल्याने भांडवली बाजारातील सूचिबद्ध बँका तसेच बिगर बँकिंग वित्तसंस्थांचा भाव बुधवारी कमालीने वधारला. तिसऱ्या फळीतील बँक परवान्यांसाठी उत्सुक असलेल्या अर्जदारांचे समभाग मूल्य तब्बल १२.५ टक्क्यांनी उंचावले. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही व्याजदराशी निगडित बांधकाम क्षेत्र सर्वाधिक १.८ टक्क्यांनी वधारले.

Story img Loader