सरत्या आर्थिक वर्षांत गृहकर्जाचे व्याजदर वार्षिक १० टक्क्यांपुढे चढले तरीही घरासाठी कर्जाच्या मागणीचे पारडे जडच राहिल्याचे स्पष्ट होत आहे. २०१३-१४ मध्ये भारतीयांकडून १.६० लाख कोटी रुपयांचे गृहकर्ज उचलले गेले असून वार्षिक तुलनेत ही वाढ १९ टक्के आहे. गृहकर्ज देणाऱ्या बँक, वित्तीय संस्थांचा कर्ज वितरणाचा आकडाही एकूण ९.६० लाख कोटी रुपयांवर गेला आहे. गृहकर्जाचे दर दुहेरी आकडय़ात असताना प्रति कर्जदाराचे सरासरी कर्ज उचलीचे प्रमाण १८ लाखावर गेले आहे.
देशातील गृहकर्ज बाजारपेठेत बँकांचा हिस्सा ६७ टक्के असून त्यात खासगी वित्तसंस्थांची आघाडी आहे. गृहकर्जविषयक बँका, वित्तीय संस्थांचे नियंत्रण असलेल्या ‘नॅशनल हाऊसिंग बँक’चे अध्यक्ष आर. व्ही. वर्मा यांनी सांगितले की, मार्च २०१३ अखेर गृहकर्जासाठी दिलेली एकूण थकीत रक्कम ८ लाख कोटी रुपये होती. गृहकर्जातून बँकांची अनुत्पादक मालमत्ता डिसेंबर २०१३ अखेर १.८१ टक्के राहिली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत प्रत्येक कर्जदाराला दिले गेलेल्या गृहकर्जाची रक्कम सरासरी १८ लाख रुपये आहे, असेही ते म्हणाले. घर खरेदीदारांना सोयीचे जावे म्हणून गृहप्रकल्पांना मानांकन देण्याच्या विचारात नियामक असल्याचेही वर्मा यांनी नमूद केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा