जपानी वाहन-निर्माता कंपनी होंडाने ‘अमेझ’ ही मिड-साइझ सेदान सादर करीत देशाच्या डिझेल इंजिन बनावटीच्या प्रवासी वाहन निर्मितीत प्रथमच शिरकाव केला, इतकेच नाही तर तिची स्पर्धात्मक किंमत ठेऊन बाजारात खरोखरीच ‘आश्चर्य’ही निर्माण केले. ५.९९ लाख रुपयांपासून सुरुवात असणारी ‘अमेझ’ ही प्रती लिटर २५.८ इंधन क्षमता देईल.
‘महिंद्र’ने स्पर्धेसाठी दंड  थोपटले
चार मीटर लांबीच्या आतील आकारातील प्रवासी कार खरेदी केल्याने ग्राहकांना तुलनेने कमी कमी कर भरावा लागतो. याच आकारातील मात्र डिझेलवर धावणाऱ्या वाहनांना खरेदीदारांची अधिक पसंती असते. गेल्या काही वर्षांपासून यामध्ये मारुती सुझुकीची स्विफ्ट डिझायर व भारतात सर्वप्रथम असे वाहन सादर करणाऱ्या टाटा मोटर्सची इंडिगो यांची चलती येथे आहे. आता त्यात जपानच्या होन्डानेही उडी घेतली आहे. पाठोपाठ स्थानिक महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रूही येऊ घातली आहे. कंपनी आपल्या ‘व्हेरिटो वाईब’सह येत्या महिन्यात डिझेल इंधन प्रकार घेऊन येईल.