इंधन नळी बदलून देण्यासाठी होंडाने वाहन माघार योजना सादर केली आहे. कंपनीच्या डिझेलवर चालणाऱ्या व डिसेंबर २०१३ ते जुलै २०१५ दरम्यान तयार करण्यात आलेल्या ९०,२१० सिटी व मोबिलिओ वाहने माघारी बोलाविण्यात आली आहेत. यामध्ये ६४,४२८ या सेदान श्रेणीतील होंडा सिटी व २५,७८३ मोबिलिओ या बहुपयोगी वाहनांचा समावेश आहे. सदोष एअरबॅगबाबतही कंपनीने यापूर्वी २.२४ लाख वाहने माघारी घेतली होती. वाहन क्षेत्रातील ऐतिहासिक वाहन माघार जर्मनीच्या फोक्सव्ॉगनने ३.२३ लाख वाहनांच्या रूपात नोंदविली आहे.

Story img Loader