जपानी होंडा मोटरसायकल अॅन्ड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) कंपनी भारतातील एकूण आठ राज्ये आणि एका संघशासित प्रदेशामध्ये क्रमांक एकची दुचाकी नाममुद्रा ठरली आहे. ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स’ (सियाम) ने प्रसिद्ध केलेल्या विक्रीच्या आकडेवारीतून हे निष्पन्न झाले आहे. होंडाने महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये (कर्नाटक, गुजरात, केरळ, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, गोवा) आणि व चंदिगडमध्ये सर्वाधिक विक्री राखली आहे. आघाडीवर असलेल्या तीन नव्या राज्यांची (गुजरात, पंजाब आणि दिल्ली)नवी भरही कंपनीच्या आलेखात पडली आहे. चालू आर्थिक वर्षांत कंपनीच्या संपूर्ण भारतातील दुचाकी बाजारपेठेतील हिस्सा २ टक्क्यांनी वाढून २६ टक्क्यांवर गेला आहे. दोन राज्ये व एक संघशासित प्रदेशामध्ये (चंदिगढ, हिमाचल प्रदेश आणि गोवा) कंपनीचा बाजारपेठेतील वाटा ५० टक्क्यांहून जास्त आहे.
होंडा महाराष्ट्रातील क्रमांक एकची दुचाकी नाममुद्रा
‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स’ने प्रसिद्ध केलेल्या विक्रीच्या आकडेवारीतून हे निष्पन्न झाले आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 27-10-2015 at 07:24 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honda two weelers on first rank in maharashtra