भारतीय दुचाकी बाजारातील आघाडीची कंपनी ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.’ (एचएमएसआय) ने बुधवारी आपली ‘ड्रीम निओ’ नव्या रंगात, नव्या ढंगात आणि नव्या अवतारात बाजारात आणली. २०१४च्या नव्या आवृत्तीत ‘ड्रीम निओ’ आता सुबक रेड स्ट्रीपसह पांढऱ्या रंगामध्ये आपल्या मिळेल. सध्याच्या उपलब्ध निओच्या रंगात पांढऱ्या रंगाच्या मोटरसायकलची भर पडली. नव्या निओमधील या आकर्षक फिचर आणि स्टाईलसाठी ग्राहकांना अतिरिक्त किंमत मोजावी लागणार नाही.
‘ड्रीम निओ’ ही होंडाच्या ड्रीम सिरिजचा एक भाग असून, या बाईकमध्ये स्टाईल, विश्वास, मेन्टेन करण्यास सोपी आणि होंडा इको टेक्नॉलॉजीसह जास्त इंधन कार्यक्षमेचे होंडाचे इंजिन इत्यादी वैशिष्ट्ये आहेत. सण आणि उत्सवाच्या काळात ‘२०१४ ड्रीम निओ’ नव्या अवतारात बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांना आपली ड्रीम बाइक घेण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध राहाणार आहेत. नव्या अवतारातील ‘ड्रीम निओ’च्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तिची मुंबईसाठीची एक्स शोरूम किंमत ४५,०६७ इतकी आहे.
सर्वसामान्यांच्या गरजा पुर्ण करणाऱ्या ‘ड्रीम निओ’ला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मध्यमवर्गातील ग्राहकांसाठी ड्रीम निओ उत्तम पर्याय असून, ड्रीम निओ आता पांढरा, काळा आणि व्हॉएलेट स्ट्रीप्स, काळा आणि रेड स्ट्रिप्स, अल्फा रेड आणि मान्सून ग्रे मेटालिक अशा पाच रंगात उपलब्ध आहे. ‘ड्रीम निओ’ने अत्यंत कमी कालावधीत लाखो भारतीयांची मने जिंकली असून, ती ग्राहकांची प्रथम पसंती बनली असल्याचा दावा कंपनीद्वारे करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honda unveils its 110cc mass motorcycle dream neo in exciting new avatar