आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये कर वाचवण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ पर्यंत आहे. कर वाचवण्यासाठी, जर तुम्ही आयकर कलम ८०C चा लाभ घेऊन जास्तीत जास्त एक लाख ५० हजार रुपयांपर्यंतची कर बचत केली असेल, तर तुम्ही इतर कायदेशीर मार्गांनीही आयकर वाचवू शकता. यासाठी तुम्हाला आयकर कलम ८०D चा वापर करावा लागेल. ज्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त एक लाख रुपयांचा कर वाचवू शकता. चला त्याबद्दल जाणून घेऊयात…..
८०D मध्ये मिळतो असा फायदा
आयकराच्या कलम ८०D अंतर्गत तुम्ही आरोग्य विमा योजना निवडल्यास, तुम्हाला प्रीमियमवर अतिरिक्त कर लाभ मिळतो. या कलमानुसार, तुम्ही पालकांसह संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर भरपूर कर वाचवू शकता.
८०D मधून तुम्ही १ लाख रूपयापर्यंत करू शकता बचत
रहेजा क्यूबीई जनरल इन्शुरन्स कंपनीचे सीईओ पंकज अरोरा यांच्या मते, ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना आरोग्य विमा प्रीमियमवर २५,००० हजार रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळतो. त्याच वेळी, ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ५०,००० रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळतो.
याचा अर्थ असा की, जर तुमचे वय ६० पेक्षा कमी असेल आणि पालकांचे वय ६० पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ७५ हजार रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळू शकतो. याशिवाय जर करदात्याचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असेल आणि त्याने स्वत: त्याच्या पालकांसाठी आरोग्य विमा खरेदी केला असेल, तर प्रीमियमवर १ लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळू शकतो.
या आरोग्य पॉलिसीवर मिळतात हे फायदे
तज्ज्ञांच्या मते, आरोग्य विमा केवळ कर सवलतींसाठी खरेदी करू नये. सध्या करोनासारख्या जागतिक महामारीने सर्वजण हैराण झाले आहेत. याशिवाय इतर अनेक गंभीर आजारांमुळेही जास्त वय असल्याने देखीलआजारी पडतात. हे लक्षात घेऊन तुम्ही आरोग्य विमा घ्यावा.
दुसरीकडे, आयकराच्या कलम ८०D अंतर्गत, तुम्ही वैयक्तिक योजना किंवा मेडिक्लेम, फॅमिली फ्लोटर प्लॅन, गंभीर आजार योजना, जीवन विमा योजनांचे हेल्थ रायडर्स आणि आरोग्य विम्याच्या इतर प्रकारांसारख्या आरोग्य कव्हर योजनांवर कर लाभ मिळवू शकता.