शेअर बाजार समजायला कठीण असा उगीचच एक गरसमज लोकांच्या मनात असतो. वस्तुत: ७० टक्के शब्द असे आहेत की त्या शब्दातच त्याचा अर्थ असतो. उदाहरणार्थ, कंपनीला इश्युअर (Issuer) म्हटले जाते. कारण जो विविध प्रकारच्या सिक्युरिटीज (शेअर्स, डिबेंचर्स, बाँड्स इत्यादी) इश्यू करतो तो इश्युअर!! ट्रेडिंग मेंबर आणि क्लीअिरग मेंबर म्हणजे काय असा प्रश्न विनिती खेडेकर यांनी विचारला आहे. तसेच शेअर बाजारात गुंतवणूक करायला किमान किती पसे लागतात, असेही त्या विचारतात.
दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर प्रथम देतो. डिमॅट यंत्रणा भारतात सुरू झाल्यावर शेअर्सचा मार्केट लॉट ‘एक’ झाला. याचा अर्थ गुंतवणूकदार कुठल्याही कंपनीचा एक शेअरदेखील विकत घेऊ शकतो किंवा विकू शकतो. डिमॅटचे हे एक वरदान आहे कारण छोटा गुंतवणूकदारही बाजारात प्रवेश करू शकतो. पूर्वी पाच, १०, २५ अशा पटीत शेअर्स खरेदी करावे लागत.
ट्रेडिंग आणि क्लीअिरग मेंबर याचा अर्थ जाणून घेण्यासाठी थोडीशी कार्यप्रणाली जाणून घ्यावी लागेल. प्रत्येक स्टॉक एक्स्चेंजचे जे ब्रोकर्स असतात त्याना ट्रेडिंग मेंबर म्हटले जाते कारण ते ट्रेड करतात. खरेदी विक्रीचा व्यवहार झाला की त्याला ट्रेड म्हणतात. जो ट्रेड करतो तो ट्रेडिंग मेंबर!! आता हे व्यवहार झाले की त्याची पूर्तता करण्यासाठी एक विभाग असतो त्याला क्लीअिरग हाऊस असे नाव आहे. मात्र क्लीअिरग हाऊस विभाग चालवण्यासाठी एक संस्थेची नियुक्ती केलेली असते. कारण त्याची स्वायत्तता जपावी असा संकेत आहे. बीएसईच्या बाबतीत हे काम ‘बीओआय शेअर होल्डिंग लिमिटेड’ करते. बँक ऑफ इंडिया आणि बीएसई यांची ही संयुक्त कंपनी आहे.
क्लीअिरग हाऊसहून थोडा वरचा दर्जा असलेली संस्था म्हणजे क्लीअिरग कॉर्पोरेशन. एनएसईसाठी हे काम पाहते ‘नॅशनल सिक्युरिटीज क्लीअिरग कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएससीसीएल). सर्वसाधारणपणे जे ट्रेडिंग मेंबर्स असतात ते क्लीअिरग हाऊसशी निगडित असतात म्हणून त्याना क्लीअिरग मेंबर्स म्हटले जाते. उदाहरणार्थ इंडिया इन्फोलाइन ट्रेडिंग मेंबर पण आहे तसेच क्लीअिरग मेंबरदेखील. जो क्लीअिरग हाऊसबरोबर संलग्न आहे. मात्र क्लीअिरग मेंबर हा ट्रेडिंग मेंबर असेलच असे नाही. बँक ऑफ इंडिया क्लीअिरग मेंबर आहे बीएसईची. पण ट्रेडिंग मेंबर नाही. कारण बँक ही ब्रोकर म्हणून व्यवसाय करू शकत नाही.
मग क्लीअिरग मेंबर म्हणून तिचे काम काय? ज्या संस्था शेअर्स खरेदी विक्री करतात त्या विकलेले शेअर्स आपल्या ब्रोकरच्या ताब्यात देत नाहीत. त्याऐवजी क्लीअिरग मेंबरकडे देतात जे क्लीअिरग मेंबर क्लीअिरग हाऊसला देतो. अर्थात त्या शेअर्सचे पसे पण क्लीअिरग हाऊस देते क्लीअिरग मेंबरला जे नंतर ज्यानी शेअर्स विकले आहेत त्या संस्थेला दिले जातात. तात्पर्य तुम्ही आम्ही शेअर्स खरेदी-विक्री केले की त्याचे पसे आपण ब्रोकरकडे देत असतो. मात्र संस्थात्मक गुंतवणूकदार ते क्लीअिरग मेंबरमार्फत वळवून घेतात. अधिक स्पष्ट करायचे तर एलआयसी ही संस्था शेअर्स खरेदी करीत असेल तर भले त्यांचा ब्रोकर शेअरखान असेल पण एलआयसी पसे देणार ते बँक ऑफ इंडिया या क्लीअिरग मेंबरला आणि क्लीअिरग हाऊस शेअर्स देणार ते देखील बँक ऑफ इंडियाला.
म्हणजेच या उदाहरणात शेअरखान ट्रेडिंग मेंबर आहे तर बँक ऑफ इंडिया क्लीअिरग मेंबर आहे.
नवीन राजीव गांधी इक्विटी योजनेअंत्तर्गत गुंतवणूक करायची ती फक्त ३१ मार्च २०१३ पर्यंतच का असा प्रश्न विचारला आहे प्रज्ञा सावंत यानी. अशी काही कालमर्यादा नाही. आपण पुढील आíथक वर्षांतही ती करू शकता. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून येत्या मंगळवापर्यंत दुपारी १२.३० वा. या विषयावर माहिती दिली जात असते त्याचा लाभ वाचकांनी घ्यावा. या योजनेत सहभागी होऊन गुंतवणूक करायला वयाची कसलीही अट नाही.
बँका शेअर ब्रोकर असतात का अशी विचारणा निर्मला प्रभुदेसाई यांनी केली आहे. बँका ब्रोकर म्हणून व्यवसाय करू शकत नाहीत. कारण बँकिंग हा त्यांचा प्रधान व्यवसाय आहे. मात्र अनेक बँका उपकंपनी स्थापन करून कार्यभाग साधतात. बँक ऑफ बडोदाची उपकंपनी आहे बॉब कॅपिटल मार्केट्स लि. जी बीएसईची ब्रोकर म्हणून व्यवसाय करते.
श.. शेअर बाजाराचा : शेअर बाजारात गुंतवणूक करायला किती पसा लागतो?
शेअर बाजार समजायला कठीण असा उगीचच एक गरसमज लोकांच्या मनात असतो. वस्तुत: ७० टक्के शब्द असे आहेत की त्या शब्दातच त्याचा अर्थ असतो. उदाहरणार्थ, कंपनीला इश्युअर (Issuer) म्हटले जाते. कारण जो विविध प्रकारच्या सिक्युरिटीज (शेअर्स, डिबेंचर्स, बाँड्स इत्यादी) इश्यू करतो तो इश्युअर!! ट्रेडिंग मेंबर आणि क्लीअिरग मेंबर म्हणजे काय असा प्रश्न विनिती खेडेकर यांनी विचारला आहे.
आणखी वाचा
First published on: 01-02-2013 at 01:34 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How much money require to invest in share market