सुरक्षिततेबाबत आयोजकांची कुठे सजगता तर कुठे दुर्लक्ष!
देशाच्या आर्थिक राजधानीत गेल्या शनिवारपासून भरलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहा निमित्ताने भरलेल्या प्रदर्शनाची गुरुवार,१८ फेब्रुवारी रोजी अखेर होत आहे. मात्र गिरगावच्या गालबोट लावणाऱ्या घटनेनंतर येथील सुरक्षिततेबाबत कुठे अवास्तवता तर कुठे पूर्णपणे दुर्ल केलेले आढळत आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित येणारा औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभाग (डीआयपीपी) तसेच देशातील उद्योजकांची आघाडीची संस्था असलेल्या भारतीय औद्योगिक महासंघ (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनात सहभागी कंपन्या, विविध राज्यांचे अधिकारी याचबरोबर प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्यांचा या दरम्यान राबता आहे. प्रदर्शनास भेट देणाऱ्यांची संख्या मंगळवारपासून वेग पकडत आहे. प्रदर्शन आवारात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाला ठराविक रंगाच्या पट्टय़ांचे ओळखपत्र दिले असले तरी नियमित येणारे प्रतिनिधी, उद्योजक, सरकारी अधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यासाठी येथे कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नाही. तसेच प्रदर्शनातील नाविन्यतेच्या कुतुहलापोटी येणारे अनेक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी यांना तपासणीसाठी लांब रांगांमध्ये उन्हात तासन् तास तिष्टित उभे रहावे लागते.
प्रदर्शनस्थळी अनेक कमी उत्पन्न गटातील वर्गाचा समावेश असून त्यांना येथील महागडी खान-पान सेवा परवडत नसल्याची नाराजी येथे व्यक्त झालेली दिसली. शिवाय मोठय़ा परिसरातील अंतर तसेच सुरक्षितेमुळे बाहेर जाण्यातील अडचण आणि प्रदर्शनाबाहेर, वांद्रे – कुर्ला संकूल परिसरात जवळपास खाण्या-पिण्याची सोय नसल्याने अनेकांना प्रदर्शन गैरसोयीचे ठरत असल्याची व्यथा अनेकांनी मांडली. प्रदर्शन आवारातील दालना दरम्यान असलेली विजेरी वाहने ही केवळ आयोजक, सरकारी अधिकारी, मंत्री, बडे उद्योजक यांच्यासाठीच असल्याचे चालक बिनदिक्कत सांगतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१८ वर्षांखालील मुलांना खुला प्रवेश!
‘मेक इन इंडिया’ सप्ताह प्रदर्शनाची माहिती असलेल्या सरकारच्या विविध संकेतस्थळावर १८ वर्षांखालील मुलांना प्रदर्शनात प्रवेश मिळणार नाही, असे नमूद केले असताना प्रत्यक्ष प्रदर्शनात मात्र लहानग्यांना त्यांच्या पालकांसह प्रवेश दिला जात होता.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge fire engulfs mumbai make in india stage