मूळच्या कोरियन कंपनी ह्य़ुंदाई मोटर इंडियाने वर्षांला पाच लाखांहून अधिक वाहने विकण्याचा संकल्प सोडला आहे. कंपनीने गेल्याच वर्षांत ४.११ लाख वाहने विकली होती. ह्य़ुंदाईच्या १२.१९ लाख रुपयांच्या नव्या व्हर्नाच्या सादरीकरणाप्रसंगी कंपनीच्या विक्री व विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश श्रीवास्तव यांनी येत्या वर्षांतील पाच लाख वाहनविक्रीचा मनोदय व्यक्त केला. नव्या व्हर्नासह कंपनीच्या एलाईट आय२० या क्रॉस ओव्हर श्रेणीतील वाहनाच्या जोरावर ह्य़ुंदाईचा वाहनविक्रीचा विश्वास बळावला आहे. महिन्यालाच सध्या लाखभर प्रवासी कार विक्री करणारी मारुती सुझुकी देशात आघाडीवर आहे.
वार्षिक पाच लाख कार विक्रीचे ह्य़ुंदाईचे लक्ष्य
मूळच्या कोरियन कंपनी ह्य़ुंदाई मोटर इंडियाने वर्षांला पाच लाखांहून अधिक वाहने विकण्याचा संकल्प सोडला आहे.
First published on: 19-02-2015 at 03:25 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyundai launches updated version of mid sized sedan verna