प्रीमियम कॉम्पॅक प्रकारातील आय २० श्रेणीतील दुसरी प्रवासी कार कोरियन कंपनी ह्य़ुंदाईने तब्बल पाच वर्षांच्या कालावधीनंतर बाजारात आणली. आय २० एलाईटच्या भारतातील सादरीकरणाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील पहिल्यांदाच ही कार उपलब्ध करून देण्यात येत आहे. यानिमित्ताने नवी दिल्लीत ह्य़ुंदाई मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. सिओ हे उपस्थित होते. नव्या आय २० एलाईटची किंमत ४.९० ते ७.६७ लाख रुपये (एक्स शोरूम – नवी दिल्ली) आहे. पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही इंधन प्रकारात ही कार उपलब्ध आहे. मारुतीची स्विफ्ट, फोक्सव्ॉगनची पोलो (ज्यांच्या किमती ४.४२ ते ७.९९ लाख रुपये आहेत) यांच्याबरोबर एलाईटची स्पर्धा असेल. कंपनीच्या जर्मनी येथील संशोधन व विकास केंद्रात या एलाईटचे आरेखन करण्यात आले आहे. आय २० सर्वप्रथम २००८ मध्ये भारतीय प्रवासी कार बाजारपेठेत आल्यानंतर तिच्या आतापर्यंत ७.३४ कारची विक्री झाली आहे.

Story img Loader