मी फरारी किंवा पळून गेलेलो नाही व देशाचा कायदा पाळीन, असे युनायटेड ब्रुअरीजचे माजी अध्यक्ष विजय मल्या यांनी म्हटले आहे.
अज्ञात ठिकाणाहून पाठवलेल्या ई-मेलमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘मी आंतरराष्ट्रीय ख्यातीचा उद्योगपती आहे, मी नेहमी इतर देशात ये-जा करीत असतो. मी भारतातून पळालेलो नाही, मी फरारी नाही. हा आरोप खोटा आहे.’
भारतीय संसदेचा खासदार म्हणून मला देशातील कायद्याबाबत आदर आहे. न्याय व्यवस्थेचा आदर आहे. पण प्रसारमाध्यमांनी सुनावणी करणे चुकीचे आहे असे सांगताना त्यांनी प्रसारमाध्यमांवर टीका केली आहे. ते म्हणतात की, जेव्हा प्रसारमाध्यमे सुडाने काही तरी करू लागतात तेव्हा आग पसरते त्यात सत्य व तथ्य दोन्ही जळून राख होतात. प्रसारमाध्यमातील अनेक प्रमुख व्यक्तींना माझ्या औदार्याचा लाभ झाला आहे. त्यांची अनेकदा राहण्याची व इतर व्यवस्थाही मी केली होती, त्याचे कागदोपत्री पुरावे आहेत, आता ते टीआरपीसाठी माझ्यावर टीका करीत आहेत.
मालमत्तेबाबतच्या चर्चेचवर बोलताना मल्या सवाल करताना ते म्हणाले, ‘बँकांना माझी मालमत्ता माहिती नाही काय, संसदीय खासदार म्हणून मी जाहीर केलेली मालमत्ता ते बघू शकतात.’ मल्या यांनी त्यांचा ठावठिकाणा मात्र जाहीर केलेला नाही,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसारमाध्यमातील अनेक प्रमुख व्यक्तींना माझ्या औदार्याचा लाभ झाला आहे. त्यांची अनेकदा राहण्याची व इतर व्यवस्थाही मी केली होती, त्याचे कागदोपत्री पुरावे आहेत.

प्रसारमाध्यमातील अनेक प्रमुख व्यक्तींना माझ्या औदार्याचा लाभ झाला आहे. त्यांची अनेकदा राहण्याची व इतर व्यवस्थाही मी केली होती, त्याचे कागदोपत्री पुरावे आहेत.