गेल्या आठवडय़ात किमान ऋण दरात (बेस रेट) कपात केल्यानंतर खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने गृहकर्जाचे व्याजदरही ०.२५ टक्क्य़ांनी स्वस्त केले आहेत. सुधारीत रचनेनुसार बँकेचा महिलांसाठीचा नवा गृहकर्ज दर ९.६० टक्के तर पुरुष ग्राहकांकरिता ९.६५ टक्के असेल. आधीच्या दराच्या तुलनेत त्यात पाव टक्क्य़ाची कपात करण्यात आली आहे.

बँकेचे गृहकर्ज आता स्पर्धक एचडीएफसी लिमिटेडच्या व्याजदराशी बरोबरी साधणारा असेल. शिवाय स्टेट बँकेच्या तुलनेत तो अवघा ०.१० टक्क्य़ाचे अंतर राखून आहे.

बँकांना किमान ऋण दरापेक्षा कमी स्तरावर कर्ज दर आकारता येत नाही. तेव्हा प्रत्यक्षातील कर्ज दर हा पाव टक्क्य़ांपर्यंत फरकाचा आहे. किमान ऋण दर आणि कर्जावर लागू व्याजदर हा भिन्न असतो.

Story img Loader