गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक सर्वसमावेषकतेवर भर देणाऱ्या आयसीआयसीआय बँकेच्या देशातील ग्रामीण व निम शहरी शाखांची संख्या ५० टक्क्यांनी वाढली असून बँक सुविधा नसलेल्या गावांमध्ये बँकेच्या ४०० शाखा कार्यरत झाल्या आहेत. शाखा व व्यवसाय प्रतिनिधींच्या माध्यमातून बँक देशभरातील १५ हजार गावांपर्यंत पोहोचली आहे. आर्थिक सर्वसमावेषकतेचे धोरण आगामी वर्षांतही सुरूच ठेवण्याचा बँकेने निर्धार केला असून रिझव्र्ह बँक व केंद्र सरकारच्या याबाबतच्या धोरणावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचे उद्दिष्ट राखले आहे.
देशातील खासगी बँक क्षेत्रात दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या या बँकेचा ग्रामीण कार्यविस्तारासाठी १० हजार जणांचा चमू कार्यरत आहे. बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखाली बँकेने आर्थिक सर्वसमावेषक धोरणाला अधिक चांगले स्परुप देण्याचा प्रयत्न असेल, असे बँकने नमूद केले आहे. बँकेच्या या धोरणाबद्दल कार्यकारी संचालक राजीव सभरवाल यांनी सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून बँक वित्तीय सेवा नसलेल्या भागात अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. बँकेचा आता भर हा नव्या खात्यांची संख्या आणि व्यवहारांचे प्रमाण वाढविण्याकडे आहे. आर्थिक साक्षरतेमार्फत तळागाळापर्यंत बँक सवय रुजविणे आम्ही याला प्राधान्य देतो. येत्या तीन वर्षांत हे धोरण व्यवहारांमध्ये वाढ आणि उत्पादनांची भर या हेतूंवर राबविले जाईल. मायक्रो एटीएम, स्मार्ट कार्ड, मोबाईल बँकिंग, आधार संलग्न वेतन आदीनंतर आता ‘बँक थेट आपल्या दारी’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. याचबरोबर पीक कर्ज, शेतीच्या उपकरणांसाठी कर्ज, जलसिंचन, दुग्ध व्यवसाय आदींनाही वित्तीय सहाय्य पुरविण्यात येणार आहे.
ल्ल आíथकदृष्टय़ा कमकुवत वर्गातील तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी ‘आयसीआयसीआय अॅकेडमी फॉर स्किल्स’ने (आयसीआयसीआय अॅकेडमी) कोल्हापूर जिह्य़ाातील नरसोबावाडी येथे केंद्र सुरू केल्याची घोषणा केली आहे.
विद्युत व घरगुती उपकरणांची दुरुस्ती, रेफ्रिजरनेशन व एअर कंडिशिनग दुरुस्ती आणि पंप व मोटर दुरुस्ती या तीन क्षेत्रात हे केंद्र प्रशिक्षण देते. यासाठी आयसीआयसीआयने स्नाईडर इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि., ब्ल्यू स्टार लि. व क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज लि. अशा भागीदारांबरोबर अनुक्रमे विद्युत व घरगुती उपकरणांची दुरुस्ती, रेफ्रिजरनेशन व एअर कंडिशिनग दुरुस्ती आणि पंप व मोटर दुरुस्ती यासाठीच्या अभ्यासक्रमांसाठी सहकार्य केले आहे. या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नरसोबावाडी केंद्रामध्ये निवासी सुविधादेखील दिल्या जात आहेत.
आयसीआयसीआय फाउंडेशन फॉर इन्क्लुजिव्ह ग्रोथने (आयसीआसीआय फाउंडेशन) समावेशक वाढीला चालना देण्याच्या योजनेनुसार ही अकादमी सुरू केली. या अकादमीचे उद्दिष्ट देशभरात पाच वर्षांत ५ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचे आहे.
याअंतर्गत २०१६ पर्यंत १५ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाईल. अकादमीचे दोन महिन्यांपूर्वी जयपूर येथे मुख्य केंद्र सुरू केल्यानंतर आयसीआयसीआयने चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू, पुणे व कोइम्बतूर येथे केंद्रे सुरू केली.
आयसीआयसीआय बँकेच्या ग्रामीण शाखांत निम्म्याने वाढ
गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक सर्वसमावेषकतेवर भर देणाऱ्या आयसीआयसीआय बँकेच्या देशातील ग्रामीण व निम शहरी शाखांची संख्या ५० टक्क्यांनी वाढली
First published on: 02-01-2014 at 08:04 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icici bank upbeat on rural expansion