आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने आयसीआयसीआय प्रुडेन्शियल डिव्हिडंड यील्ड इक्विटी फंड नावाचा खुल्या कालावधीचा इक्विटी फंड सादर केला आहे. वैविध्यकृत पोर्टफोलिओमध्ये गुंतवणुकीद्वारे दीर्घकालीन भांडवल लाभ आणि/किंवा लाभांश वितरण उपलब्ध करण्याचे या फंडाचे उद्दिष्ट आहे. या पोर्टफोलिओमध्ये मुख्यत्त्वे करुन आकर्षक लाभांश प्रतिफल सादर करणाऱ्या इक्विटी आणि इक्विटी संबंधित पर्याय समाविष्ट आहे. ज्या कंपन्यांचे लाभांश प्रतिफल गुंतवणुकीच्या वेळी सीएनएक्स निफ्टी इंडेक्सच्या लाभांश प्रतिफल (एनएसईद्वारे शेवटच्या वेळी प्रकाशित) च्या तुलनेत जास्त आहे, अशा कंपन्यांमध्ये हा निधी जमा होणार आहे. व्हॅल्यूएशन आणि फंडामेंटलच्या आखणीमध्ये उच्च लाभांश प्रतिफलाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे हेही या योजनेचे उद्दिष्ट आहे.
या फंडासाठीची योजना शुक्रवार, २५ एप्रिलपासून सुरू होत असून ती ९ मे रोजी संपेल. गुंतवणुकीसाठी सीएनएक्स डिव्डिडन्ड अपॉच्र्युनिटीज निर्देशांक आधार असेल. फंडाकरिता कमीत-कमी अर्ज रक्कम ५,००० रुपये (त्यानंतर १ रुपयाच्या पटीत) आहे. त्यानंतर गुंतवणूकदार कमीत-कमी  १,००० रुपये अर्ज रक्कमेसह पद्धतशीर गुंतवणुकीचा (एसआयपी) लाभ घेऊ शकतात.
आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल एएमसीचे मुख्याधिकारी निमेश शहा यांनी सांगितले की, उच्च लाभांश प्रतिफल देणाऱ्या कंपन्यांकडे अधिक चांगले गुंतवणूक विकल्प म्हणून पाहिले जाते. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे हे मूल्यात्मक गुंतवणूक धोरणदेखील आहे. सध्याच्या तेजीच्या बाजारामध्ये अशा कंपन्या भांडवल वाढ करण्यामध्ये आणि लाभ प्रदान करण्यामध्ये यशस्वी होतात, असा आमचा विश्वास आहे. मंदी किंवा अनिश्चित बाजारामध्येदेखील या कंपन्या भांडवल वाढीची मर्यादित संधी प्रदान करतात.

Story img Loader