मुंबई : आघाडीचे म्युच्युअल फंड घराणे आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या ‘व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडा’ने १८ वर्षे पूर्ण केली असून, फंडाच्या सुरुवातीला जर एखाद्याने १० लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर ती रक्कम आज २.५ कोटी रुपये झाली असेल, असा वार्षिक १९.७ टक्के चक्रवाढ दराने परतावा या फंडाने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाची एकूण मालमत्ता (एयूएम) २४,६९४ कोटी रुपये असून, या श्रेणीतील एकूण मालमत्तेच्या ३० टक्के हिस्सा या फंडाजवळ आहे. यातूनच गुंतवणूकदारांचा या फंडावर असलेला विश्वास स्पष्ट होतो. १६ ऑगस्ट २००४ रोजी या फंडाची सुरुवात झाली होती. अर्थलाभद्वारे संकलित आकडेवारीनुसार ३१ जुलैपर्यंत फंडाने वार्षिक १९.७ टक्के चक्रवाढ दराने परतावा दिला आहे. जर हेच १० लाख रुपये समान कालावधीकरिता निफ्टी निर्देशांकात गुंतविण्यात आले असते तर १५.६ टक्के चक्रवाढ दराने एकूण परतावा १.३ कोटी रुपये राहिला असता.

फंडाने ‘एसआयपी’ गुंतवणुकीवरही चांगला परतावा दिला आहे. स्थापनेपासून दर महिन्याला १० हजार रुपयेप्रमाणे, २१.६० लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे आज १.२० कोटी रुपये होतील. म्हणजेच हा परतावाही वार्षिक १७.३ टक्के इतका होईल. 

आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निमेश शाह यांनी स्पष्ट केले की, परदेशात मूल्यात्मक (व्हॅल्यू) गुंतवणूक ही एक प्रस्थापित आणि चांगल्या प्रकारे संशोधित संकल्पना आहे. मात्र गेल्या काही वर्षांत भारतीय गुंतवणूकदारांचे व्हॅल्यू गुंतवणुकीकडे आकर्षण वाढले आहे. अस्सल मूल्य कशात आहे आणि ते का महत्त्वाचे आहे, यासंबंधाने गुंतवणूकदार आता जागरूक बनल्याचेच हे द्योतक आहे.