आयडीबीआय बँकेने ९ कोटी रुपयांच्या सामाजिक दायित्व उपक्रमाचा भाग म्हणून बँकेच्या ग्रामीण व निमशहरी शाखांनजीकच्या शाळांमध्ये विद्यार्थी व विद्याíथनींसाठी शौचालये बांधून ‘स्वच्छ भारत मिशन’ला योगदान देण्याचे ठरविले आहे. देशातील स्वच्छता व कचरा व्यवस्थापन हे प्रश्न हाताळण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत मोहिमेची घोषणा केली होती. हा उपक्रम निमशहरी भागातील काही शाखांबरोबरच, प्रामुख्याने बँकेच्या ग्रामीण भागातील शाखांच्या नजीक असलेल्या अंदाजे ३०० शाळांमध्ये राबविला जाणार आहे. याबाबत आयडीबीआय बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. एस. राघवन यांनी सांगितले की, सरकारची ही मोहिम एक राष्ट्रीय ध्येय बनले असून, ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी व प्रामुख्याने शाळेत जाण्याचे मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नाचा हा अविभाज्य भाग असणार आहे.

Story img Loader