आयडीबीआय गिल्ट फंडच्या एनएफओची (न्यू फंड ऑफर) गुरुवारपासून पुन्हा खरेदी-विक्री सुरू झाली.
यापूर्वी ५ डिसेंबर रोजी सुरू झालेला कंपनीचा एनएफओ १७ डिसेंबर रोजी बंद झाला होता. त्यावेळी विविध ७५ केंद्रातून मिळालेल्या प्रतिसादाच्या जोरावर कंपनीने या एनएफओच्या माध्यमातून १२० कोटी रुपये जमा केले.
आयडीबीआय म्युच्युअल फंडमार्फत सप्टेंबर २०१२ अखेर ५,४१२ कोटी रुपयांचे व्यवस्थापन झाले आहे.
याबाबत आयडीबीआय असेट मॅनेजमेन्ट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक देवाशिष मलिक यांनी सांगितले की, केंद्र तसेच राज्य सरकारचे विविध कर्जरोखे, खजांची देयके आदींमध्ये गुंतवणूक करण्याची संधी या फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना उपलब्ध होत आहे. गुंतवणूकदारांना नियमित उत्पन्न देणे हाच या योजनेमागील उद्देश असल्याचेही मलिक यांनी सांगितले.
आयडीबीआयच्या गिल्ट फंडाचे व्यवहार पुन्हा सुरू
आयडीबीआय गिल्ट फंडच्या एनएफओची (न्यू फंड ऑफर) गुरुवारपासून पुन्हा खरेदी-विक्री सुरू झाली. यापूर्वी ५ डिसेंबर रोजी सुरू झालेला कंपनीचा एनएफओ १७ डिसेंबर रोजी बंद झाला होता.
First published on: 29-12-2012 at 12:13 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Idbi gilt fund deal again started