भारतामधील १५ वर्षांचे यशस्वी संपादन साजरे करणाऱ्या आयकिया फाउंडेशनने भागीदार प्रदान आजीविका ‘ब्युरो लेन्डीसा डेव्हलेपमेंट अल्टरनेटिव’ व ‘अशोका’ यांना पूर्वीचे अघोषित अनुदान देण्याचे निश्चित केले आहे.
कंपनीचे हे विस्तारीकरण देशातील मुलांचे जीवन सुधारण्यासाठी लहान स्थानिक भागीदार तसेच मानवतावादी साह्य़ता संगठन यासह कार्य करणाऱ्या ‘आयकिया फाउंडेशन’च्या प्रतिबद्धतेचे एक उदाहरण आहे, असे मानले जाते. फाउंडेशनने २०१४ वार्षकि आढावा प्रकाशित केला तेव्हा ही घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षी त्यांनी ४६ देशांमधील कार्यरत ४० भागीदारांना १०४ दशलक्ष युरोंचे अनुदान प्रदान केले. ‘कन्वेन्शन ऑन राइट्स ऑफ चाइल्ड’च्या २५ व्या वर्धापन दिनादरम्यान आयकिया फाउंडेशनने युनिसेफला सहा नवीन अनुदान प्रदान केले. ज्याची रक्कम २४.९ दशलक्ष युरो एवढी होती. देशातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य होत असल्याबद्दल आयकिया फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पेर हेजिन्स यांनी समाधान व्यक्त केले आहे.
‘आयकिया फाउंडेशन’चे ‘युनिसेफ’ला अनुदान
भारतामधील १५ वर्षांचे यशस्वी संपादन साजरे करणाऱ्या आयकिया फाउंडेशनने भागीदार प्रदान आजीविका ‘ब्युरो लेन्डीसा डेव्हलेपमेंट अल्टरनेटिव’
First published on: 24-03-2015 at 07:32 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Idea foundation decided to give grants to unicef