भारतामधील १५ वर्षांचे यशस्वी संपादन साजरे करणाऱ्या आयकिया फाउंडेशनने भागीदार प्रदान आजीविका ‘ब्युरो लेन्डीसा डेव्हलेपमेंट अल्टरनेटिव’ व ‘अशोका’ यांना पूर्वीचे अघोषित अनुदान देण्याचे निश्चित केले आहे.
कंपनीचे हे विस्तारीकरण देशातील मुलांचे जीवन सुधारण्यासाठी लहान स्थानिक भागीदार तसेच मानवतावादी साह्य़ता संगठन यासह कार्य करणाऱ्या ‘आयकिया फाउंडेशन’च्या प्रतिबद्धतेचे एक उदाहरण आहे, असे मानले जाते. फाउंडेशनने २०१४ वार्षकि आढावा प्रकाशित केला तेव्हा ही घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षी त्यांनी ४६ देशांमधील कार्यरत ४० भागीदारांना १०४ दशलक्ष युरोंचे अनुदान प्रदान केले. ‘कन्वेन्शन ऑन राइट्स ऑफ चाइल्ड’च्या २५ व्या वर्धापन दिनादरम्यान आयकिया फाउंडेशनने युनिसेफला सहा नवीन अनुदान प्रदान केले. ज्याची रक्कम २४.९ दशलक्ष युरो एवढी होती. देशातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य होत असल्याबद्दल आयकिया फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पेर हेजिन्स यांनी समाधान व्यक्त केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा