घरोघरी असलेला टीव्ही संच हा आज अनेकांच्या दृष्टीने गरज बनला असला तरी त्यावरील भरमसाट वाहिन्यांचे फुटलेले पेव आणि परिणामी लहानग्यांचा टीव्ही पाहण्यात मोठय़ा प्रमाणात जाणारा वेळ पाहता पालकांसाठी तो डोकेदुखीचा विषयही बनला आहे. त्यासाठीच ‘इडियट बॉक्स’ असे नामाभिधान मिळालेल्या या टीव्हीला खऱ्या अर्थाने विरंगुळा व मनोरंजनाच्या साधनासह, माहिती व ज्ञानसंपदेचे माध्यम बनविणारे ‘स्मार्ट’ संक्रमण आता सहज शक्य बनले आहे. टीव्हीचे छोटेखानी संगणक अथवा तत्सम स्मार्ट गॅझेटमध्ये रुपांतरण करणारी स्मार्ट उपकरणे बाजारात आता उपलब्ध झाली आहेत.
नियमित टीव्ही कार्यक्रमाच्या प्रक्षेपणासह, इंटरनेट सर्फिग आणि गेमिंगचा आनंदही टीव्ही संचावर लुटता येईल.
* अॅमकेट या कंपनीचे ‘ईव्हो टीव्ही’ हे उपकरण रु. ९,९९५ किमतीत उपलब्ध झाले आहे.
* ‘स्मार्ट बॉक्स’ हे अकाई या जपानी कंपनीने आणलेले उपकरण ६,५९० रु. किंमतीत उपलब्ध झाले आहे.
* कोणत्याही प्रकारच्या टीव्ही संचावर वापरात येणारे ‘स्मार्टपॉड’ हे रु. ९,४९९ किमतीचे एक प्रकारचे वाय-फाय राऊटर असून त्यायोगे घरगुती संगणक, लॅपटॉप आणि स्मार्टफोन वगैरे १२ वेगवेगळे गॅझेट्स परस्परांशी जोडता येऊ शकतील
इडियट बॉक्सचे ‘स्मार्ट’ संक्रमण!
घरोघरी असलेला टीव्ही संच हा आज अनेकांच्या दृष्टीने गरज बनला असला तरी त्यावरील भरमसाट वाहिन्यांचे फुटलेले पेव आणि परिणामी लहानग्यांचा टीव्ही पाहण्यात मोठय़ा प्रमाणात जाणारा वेळ पाहता पालकांसाठी तो डोकेदुखीचा विषयही बनला आहे. त्यासाठीच ‘इडियट बॉक्स’ असे नामाभिधान मिळालेल्या या टीव्हीला खऱ्या अर्थाने विरंगुळा व मनोरंजनाच्या साधनासह, माहिती व ज्ञानसंपदेचे माध्यम
आणखी वाचा
First published on: 06-12-2012 at 06:27 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ideat box transition into smart