अर्थसंकल्पात ‘सबका साथ, सबका विकास’वर लक्ष केंद्रीत करण्यात आले असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सांगितले. अल्पसंख्यांक, महिला आणि एससी, एसटी समाजातील लोकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात प्रयत्न करण्यात आले आहेत, असेही त्यावेळी म्हणाल्या.

सीतारामन म्हणाल्या, “आपल्या लोकांना चांगला रोजगार, उद्योग-व्यवसायांचे आरोग्य चांगले रहावे तसेच अल्पसंख्यांक, महिला आणि एससी, एसटी समाजातील लोकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात प्रयत्न करण्यात आले आहेत.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या जोमाने आम्ही कामाला सुरुवात केली आहे. आम्ही सर्व लोकांसमोर नम्रपणे आणि समर्पणानं सामोरं जाण्यासाठी वचनबद्ध आहोत. दरम्यान, लोकांनीही आमच्या आर्थिक धोरणावर विश्वास ठेवला आहे,” असेही यावेळी सीतारामन म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जनतेचं दरडोई उत्पन्न निश्चित करण्यासाठी आणि त्यांचे उत्पनवाढीसाठी हा अर्थसंकल्प मांडण्यात येत आहे. जीएसटीचे दर कमी करण्यात आल्याने कुटुंबातील मासिक खर्चात ४ टक्क्यांनी घट झाली आहे. जीएसटी लागू करताना सुरुवातीला काही अडचणी आल्या, मात्र जीएसटी परिषद त्या दूर करण्यासाठी कायमच प्रयत्नशीर राहिली. जीएसटीने गेल्या दोन वर्षात ६० लाखांहून अधिक करदात्यांना जोडले आहे,” असेही त्या यावेळी म्हणाल्या.