मिळकतीला बसणारी करांच्या कात्रीची धार कमी करण्यासाठी कोणती गुंतवणूक करावी, ही विवंचना एव्हाना सुरू झाली असेल. सुरुवातीलाच या संबंधाने विचार सुरू झाल्याने उपलब्ध पर्यायांपकी साजेशी निवड फुरसतीने आणि पुरती चाचपणी करून तुम्हाला करता येईल. कारण घडते असे की, प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अन्वये कर वजावटीसाठी बहुतेक मंडळी सरतेशेवटी घाई करताना दिसतात. आयत्या वेळी मग राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), करबचतीच्या ठेवी आणि अर्थातच विमा पॉलिसी अशी त्यांची गुंतवणूक निवडही सरधोपट मार्गानेच होते.

शिवाय हे करीत असताना दोन महत्त्वाच्या गोष्टी कायम दुर्लक्षिल्या जातात. एक म्हणजे तुमची गुंतवणूक ही केवळ कर वजावटीसाठीच होते; तुमच्या वरकडीतील बहुतांश हिस्सा ती फस्त करते. याचा अर्थ तुम्ही करीत असलेल्या या बचतीतून भविष्यासाठी पुंजी निर्मिती क्वचितच होते. खरेच तुम्हीच बारकाईने तपासून पाहिल्यास हे लक्षात येईल. दुसरे म्हणजे, कर वजावटीचे गुंतवणूक पर्याय हे बहुतांश दीर्घ मुदतीचे असतात. याचा अर्थ तुमचा पसा दीर्घ काळासाठी त्यात अडकला गेला आहे. त्यामुळे जोवर हा मुदतबंद (लॉक-इन) कालावधी संपत नाही तोवर तुमच्या या गुंतवणूक निर्णयावर फेरविचाराची मुभाही नसते. जर फेरविचार करून गुंतवणूक मोडलीच तर तोटा पदरी घ्यावा लागतो.

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

या दोन घटकांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की, करांच्या दृष्टीने कार्यक्षम आणि तुमच्यासाठी संपत्ती निर्माणाचे साधनही बनेल अशा सर्वोत्तम पर्यायाची तुम्ही निवड करायला हवी. कर वजावटीसाठी वर उल्लेख केलेल्या स्थिर उत्पन्न पर्यायांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला भविष्यासाठी निश्चित केलेली आर्थिक उद्दिष्टे गाठता येणे कदापि शक्य नाही.

ईएलएसएस- कर बचत करणारा संपत्ती निर्माता

नियमनांच्या अधीन उपलब्ध असलेले हे उत्पादन म्हणजे कर बचत करणारे म्युच्युअल फंड (ईएलएसएस) होय. जे तुम्हाला कर वजावटीचा लाभ देण्याबरोबरच दीर्घावधीत इच्छित पुंजी बनवून तुमचे आíथक लक्ष्यपूर्तीही साधते. तुलनेने उत्तम रोकडसुलभता (कमीत कमी लॉक-इन कालावधी) आणि दुहेरी कर वजावटीचा लाभ देण्यात ईएलएसएस हे अन्य सर्व पर्यायांपेक्षा सरस निश्चितच आहेत.
वर्षांला कमाल दीड लाख रुपयांपर्यंत तुम्ही ईएलएसएस फंडांत गुंतवू शकाल. म्हणजे तितकी रक्कम तुमच्या करपात्र उत्पन्नातून वजा होईल. हा प्रारंभिक गुंतवणुकीतून कर वजावटीचा फायदा मिळतोच. दुसरे म्हणजे तुम्ही या गुंतवणुकीतून अंतिमत: (ही एक समभाग संलग्न (इक्विटी) योजना असल्याने आणि एक वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी युनिट्स बाळगले गेल्याने) विक्रीतून होणारा लाभही करमुक्त असतो.
ईएलएसएससारख्या योजनांतून संपत्ती निर्माण किती वेगाने घडते याचीही गुंतवणूकदारांना पुरेपूर कल्पना असल्याचे दिसत नाही. भांडवली बाजाराशी संलग्न असलेली ही योजना असल्याने कर बचतीचे फंड हे इक्विटी फंडच असतात. त्यामुळे ते दीर्घ मुदतीत समभागांसारखाच परतावा देत असतात. याचा अर्थ ते दिवसागणिक वाढक्षमता असणारेही असतात आणि हा लाभ प्रत्येक दिवसाअखेर फंडाच्या बदललेल्या एनएव्हीवरून तुमच्या लक्षात येईल.

गुंतवणूक कशी करावी?

तसे पाहता आजही कर-बचतीचे फंड अथवा ईएलएसएस फंडाची शेअर बाजाराशी सांगड घातली गेल्याने त्यांना उच्च जोखीमयुक्त मानले जाते. हेच कारण असावे की, सामान्य गुंतवणूकदार त्यापासून फटकून असतो.
तथापि, या धोक्यांपासून गुंतवणूकदारांना खालीलप्रमाणे संरक्षण मिळविता येईल. एक, जरी ईएलएसएस योजनांचा लॉक-इन कालावधी हा तीन वर्षांचा असला, तरी सामान्यत: गुंतवणूकदारांनी किमान पाच वष्रे वा अधिक कालावधीसाठी त्यात गुंतवणूक कायम ठेवावी. जेणेकरून बाजारातील चढ-उतारांचा धोका टळेल व परतावा खात्रीने चांगला राहील. दुसरे, गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नियमित स्थिरपणे गुंतवणुकीच्या ‘एसआयपी’ पद्धतीचा वापर करावा, ज्यामुळे बाजाराच्या वर-खाली हेलकाव्यांतून गुंतवणुकीचे सरासरी मूल्य साधले जाईल. यातून तुम्ही त्या त्या वर्षांतील कर-वजावटीची गुंतवणूकही टप्प्याटप्प्याने नियमित स्वरूपात करू शकाल आणि अंतिम क्षणी करवजावटीसाठी घिसाडघाईने गुंतवणूक होणार नाही.

ईएलएसएस विरुद्ध पीपीएफ परतावा कामगिरीचा तौलनिक वेध
खालील आलेखातून प्रत्येक वर्षी १ लाख रुपयांप्रमाणे १५ वर्षांसाटी पीपीएफ आणि ईएलएसएस योजनांत केलेल्या गुंतवणुकीतून परतावा कसा वाढत आला ते दर्शविले गेले आहे. आलेखातून स्पष्टपणे दिसून येते की, पीपीएफमधील गुंतवणुकीतून १५ वर्षांअखेर जी पुंजी निर्माण होते, ती ईएलएसएसमधील केवळ सहा वर्षांच्या गुंतवणुकीतून उभी राहिली आहे. तर संपूर्ण १५ वष्रे गुंतवणूक करीत राहिल्यास, ईएलएसएसचा परतावा हा पीपीएफच्या तुलनेत तब्बल चार पटीने अधिक असल्याचे दिसून येईल.
eco01

* सोबतच्या उदाहरणात, पीपीएफच्या त्या त्या काळातील प्रत्यक्ष व्याजदर, तर कर बचतीचा फंड म्हणून आयसीआयसीआय प्रु. टॅक्स प्लॅनची परतावा कामगिरी ध्यानात घेतली आहे. दोहोंचा १ एप्रिल २०१५ पर्यंतचा परतावा लक्षात घेतला आहे. मागील परतावा कामगिरी ही भविष्यात तशाच कामगिरीची हमी देत नाही, हे मात्र येथे ध्यानात घेतले जावे.
* पीपीएफ ही एक १५ वष्रे कालावधीपर्यंत सुरू राहणारी गुंतवणूक असली तरी प्रत्यक्ष व्याज उत्पन्न हे १६ व्या वर्षी जमा होते आणि १६ व्या वर्षीच तिची मुदतपूर्ती होते. त्यामुळे वरील उदाहरणात तौलनिक परतावा कामगिरी त्याच आधारे मांडली आहे.

Story img Loader