कर परतावा विवरणपत्र (आयटी रिटर्न्स) सादर करण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे करदात्यांनी एकाचवेळी गर्दी केल्यामुळे आयकर विभागाचे संकेतस्थळ सोमवारी क्रॅश झाले. व्यवसाय किंवा धंदेवाईक उत्पन्न नसलेल्या प्रत्येक नोकरदार वर्गाने आपले विवरणपत्र आयटीआर-१ किंवा आयटीआर-२ अंतर्गत आयकर विभागाकडे दरवर्षी सादर करणे अपेक्षित असते. यंदाच्या वर्षाचे विवरणपत्र सादर करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे आयकर विभागाच्या http://www.incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर अनेकांनी गर्दी केली. त्यामुळे संकेतस्थळावर ताण निर्माण झाला आणि ते बंद पडले.
अखेरच्या दिवशी करदात्यांच्या गर्दीमुळे आयकर विभागाचे संकेतस्थळ क्रॅश
कर परतावा विवरणपत्र सादर करण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे करदात्यांनी एकाचवेळी गर्दी केल्यामुळे आयकर विभागाचे संकेतस्थळ सोमवारी क्रॅश झाले.
First published on: 31-08-2015 at 07:26 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Income tax e filing site crashes due to excessive rush of taxpayers on last day