विदेशातील काळ्या पैशाने चर्चेत आलेल्या एचएसबीसीच्या दक्षिण मुंबईतील मुख्यालयात प्राप्तिकर विभागाचे अधिकारी चौकशीसाठी येऊन गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मूळच्या ब्रिटनमधील बँकेच्या स्विस शाखेने ठेवीदारांचे खाते हाताळताना करचुकवेगिरी केल्याचा ठपका भारतासह सहा देशांनी ठेवला आहे.
एचएसबीसीचे फोर्ट (हुतात्मा चौक) परिसरात मुख्यालय आहे. तेथे गेल्याच आठवडय़ात मुंबईतील विभागाचे येऊन ठेवीदारांचे खाते तसेच कराबाबतची चौकशी करून गेल्याचे कळते. एचएसबीसीच्या स्विस शाखेने आपल्या खातेदारांना कर बुडविण्यासाठी मदत केल्याचा ठपका भारतीय प्राप्तिकर विभागाने ठेवला आहे. आघाडीच्या अनेक उद्योजकांकडून काळ्या पैशाची तरतूद या बँकेच्या विदेशातील शाखेमध्ये केली गेल्याची चर्चा असतानाच बँकेमागे आता कर चौकशीचा ससेमिरा लागला आहे.
‘एचएसबीसी’च्या मुंबई कार्यालयाला प्राप्तिकर अधिकाऱ्यांची धडक
विदेशातील काळ्या पैशाने चर्चेत आलेल्या एचएसबीसीच्या दक्षिण मुंबईतील मुख्यालयात प्राप्तिकर विभागाचे अधिकारी चौकशीसाठी येऊन गेल्याचे स्पष्ट झाले आहे
First published on: 25-02-2015 at 07:58 IST
TOPICSएचएसबीसी
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Income tax raid on mumbai hsbc