तुमचं वार्षिक उत्पन्न २० लाखांच्या घरात असेल तर तुम्हाला पुढील आर्थिक वर्षात इनकम टॅक्समध्ये (Income Tax) मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन याबाबत घोषणा करू शकतात. असे झाल्यास सर्वसामान्य नोकरदार आणि मध्यमवर्गियांना मोठा फायदा होईल. आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकार इनकम टॅक्सच्या स्लॅबमध्ये (Income Tax Slab) मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील काही कार्यक्रमांमध्ये इनकम टॅक्सच्या रेटमध्ये कपात करण्याचे संकेतही दिले आहेत. टॅक्स रेटबाबत विचारलेल्या प्रश्नांवर निर्माला सितारामन म्हणाल्या होत्या की, इनकम टॅक्स रेटबाबत विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. सीएनबीसी आवाजने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

तर असा असू शकेल नवीन इन्कम टॅक्स स्लॅब
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सात लाख रूपयांच्या वार्षिक उत्पन्नावर पाच टक्के इनकम टॅक्स लावण्यात यावा, असा  प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सध्या पाच लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर पाच टक्के टॅक्स आकारला जात आहे. तसेच सात ते १२ लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर १० टक्केंचा टॅक्सचा प्रस्ताव ठेवला आहे. सध्या पाच ते १० लाख रूपयांच्या वार्षिक कमाईवर २० टक्के टॅक्स आकारला जात आहे.

१० ते २० लाख रूपयांच्या वार्षिक उत्पन्नावर २० टक्के टॅक्सचा प्रस्ताव ठेवला आहे. सध्या दहा लाख रूपयांपेक्षा जास्त कमाई असणाऱ्यांना ३० टक्के टॅक्स भरवा लागत आहे. २० लाख ते १० कोटी रूपयांच्या कमाईवर ३० टक्के टॅक्सचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय १० कोटींपेक्षा अधिक उत्पन्नावर ३५ टक्केंच्या टॅक्सचा प्रस्ताव आहे. सध्याच्या टॅक्स स्लॅबनुसार, जर एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न २.५ लाख रूपयांपेक्षा जास्त असेल तर तो इनकम टॅक्ससाठी पात्र होतो.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Income tax slabs tax rate india government budget 2020 nck