भारतीय निर्मिती उद्योगाच्या दृष्टीने २०१३ चा प्रारंभ शुभ ठरला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे गमक मानले जाणाऱ्या औद्योगिक उत्पादनाचा दर जानेवारीत वधारून २.४ टक्के झाला आहे. गेल्या सलग दोन महिने घसरणीच्या फेऱ्यात अडकलेल्या या दरांमुळे आता तमाम उद्योग क्षेत्राच्या रिझव्र्ह बँकेकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षांनी मात्र अपेक्षा उंचावल्या आहेत.
डिसेंबर २०१२ मधील ०.५ टक्के आणि जानेवारी २०१२ मधील १ टक्का औद्योगिक उत्पादन दराच्या तुलनेत यंदाची वाढ मध्यवर्ती बँकेला येत्या १९ मार्चच्या मध्य तिमाही आढाव्यात किमान पाव ते अध्र्या टक्क्याची कपात करण्यास वाव देणारी असल्याचे मत केंद्रीय सरकार स्तरावरूनही व्यक्त करण्यात आले आहे.
यंदा केवळ खनिकर्म आणि भांडवली वस्तू उद्योगाची नोंद नकारात्मक स्थितीत झाली आहे. तर निर्मिती क्षेत्राची वाटचाल २.७ टक्के राहिली आहे.
जाने २०१३ डिसें २०१२ जाने २०१२
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा