समभाग निगडित म्युच्युअल फंडातील गुंतवणूक गेल्या महिन्यात १६ टक्क्य़ांनी वाढली असून ती ३.५७ लाख कोटी रुपये झाली आहे. मार्चमधील ३.४५ लाख कोटी रुपये तसेच एप्रिल २०१५ मधील ३.०६ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ती यंदा वाढली आहे.
गेल्या वर्षांत सेन्सेक्स ५ टक्क्य़ांनी घसरला होता. तर समभाग निगडित योजनांमधून फंडातील गुंतवणूक या दरम्यान ७८,००० कोटी रुपयांनी कमी झाली होती. एप्रिलमध्ये समभाग आणि समभाग निगडित म्युच्युअल फंडांमध्ये ४,४३८ कोटी रुपयांचा निधी ओघ आहे. तो गेल्या पाच महिन्यातील सर्वोत्तम असा नोंदला गेला आहे. यापूर्वी तो ६,३७९ कोटी या वरच्या टप्प्यावर होता. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ (अॅम्फी) नुसार, भारतातील एकूण ४३ म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांमध्ये एप्रिल २०१६ अखेर १४.२२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.
गुंतवणूक पर्यायात एप्रिलमध्ये निधी ओघ
समभागनिगडित म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढली
गेल्या वर्षांत सेन्सेक्स ५ टक्क्य़ांनी घसरला होता.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
First published on: 24-05-2016 at 01:05 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in shares related mutual fund investment