तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..
गेल्या दोन लेखांत निर्देश केल्याप्रमाणे निर्देशांकाला सेन्सेक्सवर ३३,६७०/ निफ्टीवर १०,४०० या पातळ्यांवर टिकण्यास वारंवार अपयश येत असल्यास निर्देशांकावर एक संक्षिप्त घसरण ही ३२,७०० / १०,२५० आणि नंतर ३२,६८३/ १०,०९४ पर्यंत असू शकेल. या अधोरेखित केलेल्या वाक्याचा प्रत्यय या आठवडय़ात येत आहे. या पाश्र्वभूमीवर पुढील आठवडा कसा असेल त्याचा आढावा घेऊया.
बाजारात घसरण चालू झाल्यामुळे सद्य:स्थितीत निर्देशांकावर ३२,४००/ १०,१०० ही ‘डू ऑर डाय’ पातळी असेल. हा स्तर टिकवण्यात निर्देशांक यशस्वी ठरल्यास तेजीची पालवी कायम राहून निर्देशांक फिरून ३३,४०० /१०,३५० वर झेपावेल.
येणाऱ्या दिवसात निर्देशांक ३३,४००/ १०,३५० च्या स्तरावर राहण्यात वारंवार अपयशी ठरत असल्यास निर्देशांक प्रथम ३२,४००/ १०,१०० आणि नंतर ३१,७५०/ ९,९५० पर्यंत निर्देशांक खाली घसरू शकतो.
या मंदीचे अंतिम टोक ३१,१००/ ९,७५० पर्यंत रुंदावू लागलेले असेल.
शुक्रवारचा बंद स्तर
सेन्सेक्स ३२,८३२.९४ निफ्टी १०,१२१.८०
सोने किमतीचा आढावा :
सोन्याच्या भावाने रु. २९,६०० चे वरचे उद्दिष्ट साध्य करून आता संक्षिप्त घसरण सुरू झाली. सोन्याचा भाव सातत्याने रु. २९,३००च्या खाली राहिल्यास सोने रु. २९,०००, रु. २८,७०० पर्यंत खाली घसरू शकते. सोन्याच्या भावात रु. २९,३०० पातळीवरच तेजी संभवते. (सोन्याचे भाव ‘एमसीएक्स’वरील व्यवहारांवर आधारित)
* एचबीएल पॉवर लि.
(बीएसई कोड ५१७२७१)
शुक्रवारचा भाव : रु. ६२.६५
एचबीएल पॉवरचा आजचा बाजारभाव हा २०० (४९), १०० (५४), ५० (६०), २० (६१) या सर्व दिवसांच्या चलत् सरासरीवर बेतलेला भाव आहे. समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. ५३ ते रु. ६६ असा आहे. रु. ६७ च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन, रु. ८० हे प्रथम वरचे उद्दिष्ट आणि रु. १००-११० हे द्वितीय उद्दिष्ट असेल. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला रु. ५०चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.
* आशीष अरिवद ठाकूर
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी स्टॉप लॉस व इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.