भारत चांगली कामगिरी करीत आहे पण त्याविषयी कुणी बोलत नाही, असे मत अमेरिकेतील अध्यक्षीय उमेदवारीच्या स्पर्धेतील डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. मेक्सिको व चीन यांच्यासारख्या विकसनशील देशांच्या विरोधात मते मांडणाऱ्या ट्रम्प यांनी भारताची प्रशंसा केली. दरम्यान फॉक्स न्यूजच्या अध्यक्षीय उमेदवारांच्या चर्चेत गुरूवारी मी सहभागी होणार नाही असे ट्रम्प यांनी सांगितले. ही चर्चा दूरचित्रवाणीवर प्रसारित केली जाणार होती, व या आधीच्या एका चर्चेत त्यांनी चर्चेच्या सूत्रसंचालिकेवर पक्षपातीपणाचा आरोप केला होता. ट्रम्प हे आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये आघाडीवर असून ते या चर्चेत असते तर रंगत आली असती पण आता त्यांची ही भूमिका टेक्सासचे सिनेटर टेड क्रूझ पार पाडतील असा अंदाज आहे. माझ्याशिवाय फॉक्स न्यूजला किती पैसे मिळतात ते बघू या असा टोमणाही ट्रम्प यांनी मारला आहे.
ट्रम्प यांनी सीएनएनला सांगितले की, भारत चांगली कामगिरी करीत आहे. गेल्यावर्षी अध्यक्षीय उमेदवारीच्या स्पर्धेत उतरल्यापासून त्यांनी पहिल्यांदा भारताताबाबत मत व्यक्त केले आहे. २००७ मध्ये सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत चीन, मेक्सिको व जपान या तीन देशांवर मात्र त्यांनी उघडपणे टीका केली होती.
ते म्हणाले की, सगळीकडे बघा इराक, इराण, चीन, भारत, जपान . पण भारताकडे बघितले तर आता या देशाला जागतिक पातळीवर एक स्थान मिळू लागले आहे, हा देश आता थट्टेचा विषय राहिलेला नाही. अचानक लोक चीन, भारत या देशांविषयी बोलू लागले, अगदी आर्थिक आघाडीवरही तीच परिस्थिती आहे. अमेरिका कुठल्या कुठे घसरली आहे. त्याचे मला दु:ख आहे. जगात आता अमेरिकेला मानाचे स्थान राहिलेले नाही. भारत चांगली कामगिरी करीत आहे, त्याविषयी कुणी बोलत नाही व अनेक नोक ऱ्या भारताकडे जात आहेत पण तरीही भारत मोठीच कामगिरी करीत आहे यात शंका नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा