येत्या आर्थिक वर्षांत वस्तू व सेवा कर लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या संकेताने एकूणच निर्मिती क्षेत्राला ऊर्जा मिळण्याची आशा व्यक्त करतानाच जागतिक बँकेने चालू वर्षांत देशाचा विकास दर ५.६ टक्के राहील, असे अंदाजले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या ५.५ टक्के अपेक्षेपेक्षा हा अंदाज अधिक वेगाचा आहे.
जागतिक बँकेच्या सोमवारी येथे जाहीर झालेल्या ‘इंडिया डेव्हलपमेन्ट अपडेट’ अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेबाबत हा आशावाद व्यक्त करण्यात आला. केंद्रात पूर्ण बहुमताने सत्तेवर आलेल्या नव्या सरकारकडून सुधारणांचा कार्यक्रम अविरत सुरू राहील आणि त्याचा परिणाम वर्षअखेर ५.६ टक्के विकास दर होण्यावर होईल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बँकेने त्यापुढील २०१५-१६ साठी ६.४, तर २०१६-१७ करिता ७ टक्के विकास दर अपेक्षित केला आहे. केंद्र सरकारने संकेत दिलेल्या आगामी वर्षांपासूनच्या वस्तू व सेवा कराचे स्वागतही या अहवालाने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा