ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटी‘(जीएफआय) या अमेरिकास्थित संस्थेने प्रसिद्धकेलेल्या अहवालानुसार, गेल्या दशकात आर्थिक संकटातून सावरण्याच्या प्रयत्नातून भारतीय अर्थव्यवस्थेने सुमारे १२३अब्ज डाँलर काळ्या पैशाच्या रुपात गमावले आहेत. तसेच काळ्या पैशाच्या मार्गाने अर्थव्यवस्थेला फटका बसणा–या देशांच्या क्रमवारीत भारताला आठवा क्रमांक मिळाला आहे. ‘जीएफआय‘ च्या यादीतील पहिल्या वीस देशांच्या क्रमवारीत समावेश झालेला भारत हा दक्षिण आशियातील एकमेव देश आहे. २०१०या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेला १.६०अब्ज डाँलरचे नुकसान झाले आहे. तर याचा सर्वाधिक फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. यात चीनला २७४०अब्ज डाँलरचे नुकसान झाले आहे.
काळ्या पैशाचा फटका बसलेले देश (अब्ज डाँलरमध्ये)
चीन २,७४०
मेक्सिको ४७६
मलेशिया २८५
सौदी अरेबिया २०१
रशिया १५२
फिलिपिन्स १३८
नायजेरिया १२९